रमेश कोनकर यांची भाजप कल्याण जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

Monday, October 5, 2026 - 02:10
रमेश कोनकर यांची भाजप कल्याण जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

आंबिवली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्या कल्याण जिल्हा उपाध्यक्षपदी आंबिवली येथील ज्येष्ठ पदाधिकारी रमेश कोनकर यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर परब यांनी रविवारी आयोजित कार्यक्रमात कोनकर यांच्या निवडीची घोषणा केली.

रमेश कोनकर हे भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी असून त्यांनी पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. तसेच त्यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन समितीचे सभापती म्हणूनही काम पाहिले आहे.

यावेळी महापालिकेचे सभागृह नेते वरुण पाटील, भाजप महाराष्ट्र महिला मोर्चाच्या प्रदेश कोषाध्यक्ष मनीषा केळकर, मोहोने मंडळ प्रभारी रमेश गोरे, जिल्हा सरचिटणीस रविसिंह ठाकूर, मोहोने मंडळ अध्यक्ष नवनाथ बाळाराम पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोनकर यांच्या निवडीचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले

.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0