दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिधा रवाना: आ. राजेश मोरे यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई (प्रतिनिधी) : गोरेगाव येथील नेस्को मैदानावर आयोजित शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी शिध्याने भरलेली वाहने रवाना करण्यात आली. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश गोवर्धन मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि भगवा झेंडा दाखवून या मदतकार्याचा शुभारंभ करण्यात आला.
शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून हे मदतकार्य राबविण्यात आले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार आनंद परांजपे, आमदार बालाजी किणीकर, राजेश कदम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा शुभारंभ करण्याचा मान मिळणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असून, त्याचबरोबर सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा क्षण असल्याची भावना आमदार राजेश मोरे यांनी व्यक्त केली.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0