अभिजीत दिपकेंविरोधात कल्याणमध्ये भाजपचे निषेध आंदोलन
कल्याण (प्रतिनिधी) : मुंबईतील शनिवारी झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी कल्याणमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने अभिजीत दिपके यांच्याविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
‘दिपके पंजाब, झारखंडवर बोला’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. भाजपच्या जुन्या कल्याण शहराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात सीजेपीचे अभिजीत दिपके यांची भूमिका भाजपविरोधी असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला.
भाजपचे सरकार असलेल्या राज्यांमध्येच आंदोलन केले जाते, तर इतर राज्यांतील घटनांबाबत वेगळी भूमिका घेतली जाते, असा दावा यावेळी करण्यात आला. या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आल्याचे यावेळी उपस्थितांना संबोधित करताना भाजपचे जुने कल्याण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक अमित धाक्रस यांनी सांगितले.
आंदोलनात नगरसेवक जतिन प्रजापती, कल्याण जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम तरे, प्रताप टुमकर, शुभा पाध्ये, प्रशांत माळी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0