गुहागर विधानसभा ७२ गाव विभागात विकासकामांचा धडाका!
गुहागर (प्रतिनिधी): गुहागर विधानसभेतील ७२ गाव विभागात विविध महत्त्वपूर्ण विकासकामांचा उद्घाटन सोहळा शिवसेनेचे (शिंदे गट) गुहागर विधानसभेचे समन्वयक विपुल कदम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.
उद्घाटन झालेल्या प्रमुख विकास कामांमध्ये उभळे देऊळवाडी मुख्य रस्ता ते गुरववाडी पर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, उभळे आरोग्यकेंद्र ते मधलीवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, आंबेरे बौद्धवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, कौधर ताम्हाणे बौद्धवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, चिवेली तांबडवाडी मुख्य रस्ता ते महेश कदम यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या कामांचा समावेश होता.
याप्रसंगी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती मयुरी शिर्के, जिल्हा परिषद सदस्या शिवानी सावंत, तालुका प्रमुख रुपेश घाग, युवासेना विधानसभा संपर्क प्रमुख सागर गुजर,युवासेना तालुका प्रमुख विक्रांत चव्हाण, धनश्री शिंदे, संदीप सावंत, महादेव मोरे आदी पदाधिकाऱ्यांसह ७२ गाव विभागातील स्थानिक ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0