खिडकाळी गावातील म्हात्रे आळी रस्त्याच्या विकासकामाचे आ. राजेश मोरे यांच्या हस्ते भूमिपूजन

Tuesday, October 27, 2026 - 02:07
खिडकाळी गावातील म्हात्रे आळी रस्त्याच्या विकासकामाचे आ. राजेश मोरे यांच्या हस्ते भूमिपूजन

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील खिडकाळी गावातील म्हात्रे आळी येथील रस्त्याच्या विकासकामाचे भूमिपूजन सोमवारी आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते संपन्न झाले. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून हे काम करण्यात येत असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांची दळणवळणाची सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विशेष निधीतून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील विविध भागांमध्ये मूलभूत सुविधांच्या विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे. याच विकासकामांच्या मालिकेअंतर्गत खिडकाळी गावातील म्हात्रे आळी येथील रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

स्थानिक नागरिकांची रस्त्याच्या विकासाची गरज लक्षात घेऊन हे काम मार्गी लावण्यात आले आहे. विकासकामे केवळ कागदावर न राहता त्यातून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडला पाहिजे, हा आपला प्रयत्न असल्याची भूमिका यावेळी आमदार मोरे यांनी मांडली. खिडकाळी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढेही विविध विकासकामे सुरू राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या विकासकामासाठी उपमहापौर रमाकांत मढवी, नगरसेवक बाबाजी पाटील, नगरसेविका अर्चना पाटील तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विशेष सहकार्य लाभल्याचेही ते म्हणाले.

यावेळी विभागप्रमुख विष्णू कोटकर, उपतालुका प्रमुख गणेश जेपाल, विभाग संघटक नवनाथ पाटील, मधुकर पाटील, दिपेश भरत पाटील, सुखदेव पाटील, लालचंद पाटील, रमेश काठे, सत्यवान पाटील, राहुल पाटील, महेश ठाकूर आणि सागर पाटील यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी, शिवसैनिक व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0