बामाल्ली शाळेच्या नूतनीकरणाला आमदार राजेश मोरे यांच्या निधीतून सुरुवात
डोंबिवली (प्रतिनिधी): नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील बामाल्ली येथील शाळेच्या दुरवस्थेची दखल घेत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांनी शाळेच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर शाळेच्या नूतनीकरणाच्या कामाला नुकतीच सुरुवात करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बामाल्ली येथील शाळेची इमारत दीर्घकाळापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होती. इमारतीची अवस्था दिवसेंदिवस खराब होत गेल्याने विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. इमारतीच्या काही भागांची अवस्था धोकादायक झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता निर्माण झाली होती.
शाळेच्या दुरुस्तीसाठी शासकीय निधी मिळविण्याच्या प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने कामाला विलंब होत होता. या पार्श्वभूमीवर निधीअभावी विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि सुरक्षितता धोक्यात राहू नये, या भूमिकेतून आमदार राजेश मोरे यांनी शाळेच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
निधी प्राप्त झाल्यानंतर शाळेच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी, शाळा समितीचे सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख गणेश जेपाल, विभागप्रमुख किसन जाधव, ठाणे जिल्हा बजरंग दल प्रमुख मोतीराम गोंधळी, गटशिक्षण अधिकारी सुनीता मिठागरे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित आणि सुस्थितीत शैक्षणिक वातावरण उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0