केडीएमसीच्या २३ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे आदेश

Thursday, October 1, 2026 - 15:00
केडीएमसीच्या २३ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे आदेश

कल्याण (प्रतिनिधी): कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी संवर्गात कार्यरत असलेल्या २३ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे आदेश प्रदान करण्यात आले. यामध्ये शिपाई, बहुउद्देशीय कामगार, सफाई कामगार आणि सुरक्षा रक्षक या संवर्गातील २२ कर्मचाऱ्यांना वर्ग-३ मधील ‘लिपिक टंकलेखक’ पदावर, तर अग्निशमन विभागातील एका कर्मचाऱ्याला ‘उप अग्निशमन केंद्र अधिकारी’ पदावर पदोन्नती देण्यात आली.

चतुर्थ श्रेणीतील शिपाई, बहुउद्देशीय कामगार, सफाई कामगार आणि सुरक्षा रक्षक या विविध संवर्गात कार्यरत असलेल्या २२ कर्मचाऱ्यांनी लिपिक पदासाठी आवश्यक अर्हता प्राप्त केली होती. त्यानुसार पदोन्नती समितीने केलेल्या शिफारशीनंतर या कर्मचाऱ्यांना वर्ग-३ मधील ‘लिपिक टंकलेखक’ पदावर पदोन्नती देण्यात आली.

पदोन्नतीचे आदेश महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, सभागृह नेते वरुण पाटील, महिला व बाल कल्याण समिती सभापती सारिका जाधव, शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे, भाजपा गटनेते शशिकांत कांबळे, पालिका सदस्य दिपेश म्हात्रे, महापालिका सचिव किशोर शेळके आणि सामान्य प्रशासन विभागाच्या उपआयुक्त वंदना गुळवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

दरम्यान, अग्निशमन विभागातील वर्ग-४ संवर्गात ‘अग्निशमन प्रणेता (लीडिंग फायरमन)’ या पदावर कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यालाही वर्ग-३ मधील ‘उपअग्निशमन केंद्र अधिकारी’ पदावर पदोन्नती देण्यात आली. त्याबाबतचा पदोन्नती आदेशही यावेळी प्रदान करण्यात आला.

पदोन्नतीचे आदेश मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव दिसून आले. पदोन्नतीमुळे कर्मचाऱ्यांना सेवेत पुढील जबाबदारीची संधी मिळाली आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0