द्वारली गावातील विठ्ठल बडे यांच्या घरी गणपती बाप्पाचे भक्तिभावाने विसर्जन!
कल्याण (प्रतिनिधी):
कल्याण पूर्वेतील द्वारली गावचे रहिवासी विठ्ठल बडे यांच्या घरी श्री गणेशाची अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने स्थापना करण्यात आली होती. सलग अकरा दिवस दररोज नियमित आरती, पूजा आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून बाप्पाची मनोभावे सेवा करण्यात आली.
यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पासाठी ओमकार घुगे यांनी अत्यंत आकर्षक आणि विलोभनीय असा नैसर्गिक देखावा तयार केला होता. निसर्गाच्या कुशीत विसावलेले बाप्पा आणि पार्श्वभूमीवर श्रीकृष्णाची सुंदर प्रतिमा या देखाव्याचे मुख्य आकर्षण ठरले. हा सुंदर देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. साकेत को-ऑप हाऊसिंग सोसायटीच्या सदस्यांनी श्री विठ्ठल बडे यांच्या निवासस्थानी जाऊन विसर्जन सोहळ्यात उत्साहाने भाग घेतला. सर्वांच्या उपस्थितीमुळे या घरगुती गणेश विसर्जन सोहळ्याला एका मोठ्या कौटुंबिक उत्सवाचे स्वरूप आले होते
अकरा दिवसांच्या भक्तिमय सेवेनंतर बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" अशा जयघोषात आणि मंगलमय वातावरणात विसर्जन सोहळा पार पडला. बाप्पाच्या विसर्जनाने बडे कुटुंबीय आणि उपस्थितांचे डोळे भारावून गेले होते.

What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
1
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0