केडीएमसीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ

Wednesday, October 28, 2026 - 23:21
केडीएमसीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ

कल्याण (प्रतिनिधी) : भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती करण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजात प्रामाणिकपणा व पारदर्शकतेची जाणीव दृढ करण्याच्या उद्देशाने दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली. सोमवारी आयोजित या कार्यक्रमाला महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी आणि महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांची प्रमुख उपस्थिती होती.

महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे यांनी उपस्थितांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ दिली. यावेळी महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांनीही भ्रष्टाचारविरोधी प्रतिज्ञा घेत दक्षता जनजागृती सप्ताहात सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला उपायुक्त वंदना गुळवे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सपना रामोळे, डॉ. विनोद दौंड, डॉ. गणेश डोईफोडे, डॉ. संदीप मुकणे, सुरक्षा अधिकारी भरत बुळे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून भ्रष्टाचार निर्मूलन, प्रामाणिकपणा आणि सार्वजनिक प्रशासनातील जबाबदारी यांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. मात्र, अशा शपथविधी उपक्रमांसोबतच दैनंदिन प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि भ्रष्टाचारविरोधी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होणेही महत्त्वाचे आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0