‘नमो रमो’ नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी व्यापाऱ्यांची मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ लाखांची मदत
डोंबिवली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्या वतीने दरवर्षी डोंबिवली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘नमो रमो नवरात्रोत्सवा’च्या पहिल्याच दिवशी शहरातील व्यापारीवर्गाने राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत ५१ लाख रुपयांची भरघोस मदत दिली. या निधीचा धनादेश रविवारी संत सावळाराम क्रीडा संकुलात आयोजित नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही नमो रमो नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक भाग दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, या उद्देशाने डोंबिवलीतील व्यापारीवर्गाने पुढाकार घेत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी यथाशक्ती आर्थिक योगदान दिले आहे.
नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत नागरिकांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जास्तीत जास्त आर्थिक मदत जमा करावी, असे आवाहनही रवींद्र चव्हाण यांनी केले. या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0