शिवराज्य ब्रिगेडची राज्य कार्यकारिणी जाहीर; विभागीय अध्यक्षांच्या नियुक्त्या

Friday, October 2, 2026 - 14:30
Updated: 4 days ago
शिवराज्य ब्रिगेडची राज्य कार्यकारिणी जाहीर; विभागीय अध्यक्षांच्या नियुक्त्या

मुंबई (प्रतिनिधी) : शेतकरी, कामगार आणि युवकांच्या विविध प्रश्नांवर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या शिवराज्य ब्रिगेडच्या संघटनात्मक विस्ताराला वेग देण्यात आला आहे. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात झालेल्या संघटनेच्या कोअर कमिटीच्या बैठकीत राज्य कार्यकारिणीची नव्याने रचना जाहीर करण्यात आली. याच बैठकीत महाराष्ट्रातील विविध विभागांच्या अध्यक्षांचीही नियुक्ती करण्यात आली.

सन २०२१ मध्ये स्थापन झालेल्या शिवराज्य ब्रिगेडने गेल्या काही वर्षांत शेतकरी, कामगार आणि युवकांच्या प्रश्नांवर काम करण्यावर भर दिला आहे. संघटनेची आगामी वाटचाल, विविध भागांतील संघटनात्मक बांधणी मजबूत करणे आणि स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

जाहीर करण्यात आलेल्या राज्य कार्यकारिणीत संस्थापक अध्यक्ष अमोल जाधवराव, कार्याध्यक्ष विजय बल्लाळ, उपाध्यक्ष सचिन कळझुणकर व आकाश साळुंखे, महासचिव शैलेश चव्हाण, सचिव प्रविण आंब्रे, संघटक प्रमुख दत्ता चव्हाण, कोषाध्यक्ष विकास चव्हाण आणि मुख्य समन्वयक सुभाष गायकवाड यांचा समावेश आहे. तसेच संघटक म्हणून अरुण काकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, विभागीय पातळीवरील जबाबदाऱ्याही निश्चित करण्यात आल्या आहेत. मुंबई विभागीय अध्यक्षपदी सोपान सावंत, कोकण विभागीय अध्यक्षपदी सुजय सावंत, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी सुशांत यादव, मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी जीवन चौगुले, तर विदर्भ विभागीय अध्यक्षपदी कृष्णा साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवीन कार्यकारिणी आणि विभागीय अध्यक्षांच्या नियुक्त्यांनंतर आता जिल्हा व तालुका पातळीवरील संघटनात्मक बांधणीला वेग देण्यात येणार आहे. आगामी टप्प्यात जिल्हाध्यक्ष तसेच तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष अमोल जाधवराव यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये संघटनेची व्याप्ती वाढवून स्थानिक प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याच्या दृष्टीने ही संघटनात्मक पुनर्रचना करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका पातळीवर जबाबदाऱ्या निश्चित करून संघटनेची रचना अधिक व्यापक करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली

 आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0